गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३
बुधवार, ९ जानेवारी, २०१३
पाऊस कधीचा पडतोच आहे.
पाऊस कधीचा पडतो,
का कुणास ठाऊक,
सारखा रागाने वर्षाव करतो.
मधेच एक सर येते,
आनंदाची खुप दिवसाने,
खुलुन जातं जीवन सारं,
एखाद्या फुलावरच्या दवबिंदु प्रमाणे.
खुप दिवस वाट पाहत होतो त्या सरीची,
एखाद्या चातका प्रमाणे.
विनवण्या करत होतो,
एखाद्या नवसा प्रमाणे.
आकाशात काळे ढग जमा झालेत पण
नकोसा तो वाटणारा जोरदार पाऊस,
एखाद्या मारकुट्या मास्तरची आठवण करुन देणारा.
पण आठवण खुप येते,
त्या न्याहाळणा-या सरीची....
पाऊस कधीचा पडतोच आहे..........
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

